
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने एक मोठी किमया करून दाखवली आहे. डीआरडीओने एक्सटेंडेड ट्रझॅक्टरी लाँग डयूरेशन हायपरसोनिक क्रूझ मिसाईल (ईटी-एलडीएचसीएम) ची यशस्वी चाचणी केली आहे. हे प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. ही मिसाईल आपला वेग, रेंज आणि लक्ष्य यासाठी ओळखली जाणार आहे. ही एक हायपरसोनिक क्रूझ मिसाईल आहे. याला डीआरडीओने पूर्णपणे स्वदेशी टेक्नोलॉजी ने बनवले आहे. याचे खास वैशिष्टये म्हणजे ही हायपर सोनिक मिसाईल सध्याच्या सुपरसोनिक मिसाइल ब्रह्मोस पेक्षा पैक पटीने वेगवान आहे. पाकिस्तान आणि चीन हे दोन देश हिंदुस्थानच्या टप्प्यात येत आहेत. या मिसाईलला गुजरातपासून लाँच केले तर इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी टप्प्यात येतात. अरुणाचल किंवा लडाखहून ही मिसाईल लाँच केली तर चीनमधील तिब्बत, शिंजियांग ही ठिकाणे टप्प्यात येतात.
क्षेपणास्त्राचे खास वैशिष्टय़े
ही मिसाईल मॅक 8 च्या वेगाने उड्डाण करू शकते. जी जवळपास 11 हजार प्रति किलोमीटर आहे. ब्रम्होस सुपरसोनिक च्या तुलनेत तीन पट जास्त वेगवान आहे.
या मिसाईलची रेंज क्षमता 1500 किमी आहे. याचाच अर्थ चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश या मिसाईल च्या टप्प्यात येतात. शत्रूंच्या कोणत्याही टप्प्यात हल्ला करण्याची क्षमता आहे.
या मिसाईलमध्ये 1 हजार ते 2 हजार किलो वजनाची परमाणू वारहेड घेऊन जाण्याची क्षमता आहे. यात व्रॅमजेट इंजिन दिले आहे. जे वायुमंडल ते ऑक्सिजन घेऊन इंधन जाळते.
ही मिसाईल कमी उंचीवरून उडू शकते. ही मिसाईल रडार पासून स्वतःला वाचवते. ही दिशा बदलते. याला शत्रूचे एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा थांबू शकत नाही.