आमचीच कोरोना लस घ्या; चीन नेपाळला धमकावतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीन आपल्या शेजारच्या छोटय़ा देशांना सतत आपल्या दबावात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड झाले आहे. नेपाळने हिंदुस्थानऐवजी आमचीच कोरोना प्रतिबंधक लस वापरात आणावी असा दबाव चीन टाकत असल्याचे नेपाळी मीडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तांवरून स्पष्ट झाले आहे. चीनची सायनोफार्म कंपनी कोरोना प्रतिबंधासाठी सायनोवॅक लस बनवत आहे. हीच लस नेपाळी नागरिकांसाठी वापरात आणावी असा दबाव चीनचे जिनपिंग प्रशासन नेपाळी राज्यकर्त्यांवर टाकत असल्याचे नेपाळी मीडियाने म्हटले आहे. शुक्रवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप जवाली यांना फोन केला होता. त्यांनी प्रदीप यांच्यावर चिनी कोरोना लस वापरण्याचा दबाव आणला असल्याचे समजते.