
चीनच्या सरकारने देशातील जन्मदर वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी एक अनोखी ऑफर देऊ केली आहे. सरकारच्या ऑफरनुसार, 1 जानेवारी 2025 नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या आई-वडिलांना सरकार प्रत्येक मुलाला 1.2 लाख रुपयाचे रोख बक्षीस देणार आहे. ही रक्कम मूल तीन वर्षांचे होईपर्यंत दिली जाणार आहे. चीनची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये केवळ 95.4 लाख मुले जन्माला आली आहेत. 2016 मधील वन चाइल्ड पॉलिसी संपल्यानंतर ही जवळ जवळ अर्धी संख्या आहे. चीनने दशकभरापूर्वी वन-चाइल्ड पॉलिसी संपवली आहे. परंतु त्यानंतरही चीनमधील लोक जास्तीची मुले जन्माला घालत नाहीत. मंगोलियातील होहोट शहरात दुसरे मूल जन्माला घातल्यास 50 हजार युआन म्हणजेच जवळपास 6 लाख रुपये आणि तिसरे मूल जन्माला घातल्यास 12 लाख रुपयांची आर्थिक मदत पालकांना केली जाते.