चिंचणीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन, 40 जणांवर गुन्हा दाखल

420

देशासह राज्यात कोरोना महामारीचा कहर सुरूच असून यापासून नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून प्रशासन वेगवेगळे उपाय योजना राबवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नुसार संपुर्ण पुणे जिल्हात, नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, विनाकारण जमाव न जमविणे, राजकीय, धार्मिक कार्यक्रम न करणे अशा पद्धतीच्या अटी असताना ही रविवार 5 जून ला शिरूर तालुक्यातील चाचणी येथे बेकायदेशीर जमाव जमवून, तोंडाला मास्क न लावता, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे बेकायदेशीर जमाव जमवून, तोंडाला मास्क न लावता पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कलम 188 नुसार शिरूर पोलिस ठाण्यात अनिल माणिक पवार, आकाश संभाजी पवार, अमोल सोनबा पवार, दत्तात्रय पांडुरंग पठारे, श्रीकांत हिरामण पवार, प्रेमराज भगवान खुले, गोरख शिवाजी पवार, राजेंन्द्र आबासाहेब पवार, अनिल सुभेदार पवार, लक्ष्मण बाबासाहेब पवार, संभाजी बाबासाहेब पवार सर्व रा. चिंचणी व इतर 30-35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ही खानापुरे यांनी दिली.

सर्व नागरिकांना शिरूर पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ,सद्य स्थितीत कोरोना साथीमुळे शासन आदेशा नुसार फक्त अंतिम संस्कार व लग्नसोहळ्यासाठीच मर्यादित नागरिकांच्या उपस्थित हे दोन विधी करता येतील, धार्मिक सोहळे, राजकीय मेळावे किंवा स्नेहमेळावे, एकत्रित जेवणावळी अशा सर्व कार्यक्रमावर बंदी असून कुणीही शासन आदेशाचा भंग केला तर त्या इसमावर कठोर कारवाई केली जाईल.
– प्रविण खानापुरे – पोलीस निरिक्षक, शिरूर पोलीस स्टेशन

आपली प्रतिक्रिया द्या