बलात्काराला विरोध केल्यावर कपडे फाडायचे स्वामी चिन्मयानंद, पीडितेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. या प्रकरणी पीडितेने केलेल्या तक्रारीत चिन्मयानंद हे विरोध केल्यानंतर आपले कपडे फाडत असल्याचा आरोप केले आहेत.

शहाजहांपूर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी पीडितेच्या वकिलांनी न्यायालयासमोर तिने केलेले आरोप कथन केले. पीडितेला वारंवार आश्रमात बोलावलं जायचं. तिच्यावर अत्याचार करण्यासाठी चिन्मयानंद तिला कपडे काढायला सांगायचे. तिने जर तसं करायला विरोध केला तर चिन्मयानंद तिचे कपडे फाडायचे. या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीनेही पीडिता वरचेवर आश्रमात येत असल्याच्या आरोपांची चार साक्षीदारांनी पुष्टी केल्याचं न्यायालयात सांगितलं.

पीडितेने केलेल्या आरोपांनुसार, चिन्मयानंद एका खोलीत तिच्यावर वारंवार बलात्कार करायचे. या प्रकरणी असेही काही पैलू उघड होत आहेत, जे पीडितेच्या आरोपांशी मिळते जुळते आहेत. तिला वारंवार आश्रमात बोलावणं हे सर्वात जास्त संशयास्पद आहे. कारण पीडितेच्या शैक्षणिक बाबींशी याचा काहीही संबंध नव्हता, याकडेही एसआयटीच्या पथकाने न्यायालयाचं लक्षं वेधलं आहे.

दुसरीकडे शहाजहांपूर जिल्हा न्यायालयाने स्वामी चिन्मयानंद आणि पीडिता या दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले आहेत. या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी स्वतःच येण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली आहे.