
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 तीन वर्षात सुमारे 250 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी मालवण-कुडाळ मतदार संघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या निधीतून 25 हुन अधिक रस्ते करण्यात आले आहेत. किनारपट्टीवरील गावात पर्यटन वाढीच्या दृष्टीने अनेक रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. देवली येथे नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यामुळे चिपी विमानतळ ते तारकर्ली-देवबाग ही पर्यटन गावे जोडली जाणार आहेत. आगामी काळातही मतदार संघातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी देवली येथे बोलताना व्यक्त केले.
मालवण तालुक्यातील खालची देवली ते वरची देवली या तीन किलोमीटर लांब जोड रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2 कोटी 88 लाख मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार नाईक यांच्या हस्ते देवली येथे करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जिल्हापरिषद हरी खोबरेकर, देवली सरपंच गायत्री चव्हाण, उपसरपंच भाऊ चव्हाण, जेष्ठ शिवसैनिक, रमेश चव्हाण, शाखा प्रमुख सचिन मालवणकर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, गुरुनाथ पाटकर, शाम वाककर, बाळकृष्ण चव्हाण, कल्पना आळवे, संतोष आळवे, सुरेश नाईक, साबाजी परब, भगवान आळवे, निलेश चव्हाण, गंगाराम परब, जगदीश हडकर, आकाश बिरमोळे, विनायक चव्हाण, शरद आळवे, रामचंद्र चव्हाण, अनथोनी फर्नांडिस, वासुदेव चव्हाण, समीर आळवे, अशोक बिरमोळे, दाजी चव्हाण, शाम चव्हाण, दाजी चव्हाण, गणेश बिलवडकर, महेश शिरपुटे, दीपक देसाई, ठेकेदार आशिष परब व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
1880 साली हा मातीचा रस्ता सुरू झाला. 1991 साली त्यावर खडीकरण करण्यात आले. त्यानंतर हा रस्ता डांबरीकरण व्हावा ही ग्रामस्थांनी मागणी सातत्याने सुरू होती. जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तात्काळ मंजूर करण्यात आला. या रस्त्यामुळे चिपी विमानतळ, देवली काळेथर मार्गे तारकर्ली हे अंतर अवघ्या अर्द्या तासात शक्य होणार आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेत लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा अश्या सूचना आमदार नाईक यांनी संबंधित ठेकेदारास दिल्या.
देवली गावातील लहान मुले शालेय निबंध लिहिताना आपला आवडता नेता हरी खोबरेकर लिहितात. हीच खोबरेकर यांच्या कामाची पोच पावती आहे. गावातील समस्या सोडवत विकासाला प्राधान्य देणाऱ्या हरी खोबरेकर यांना देवली गावातील ग्रामस्थ आपल्या घरातील सदस्य मानतात, असे सांगत स्वाभिमान पक्षाचे उपसरपंच भाऊ चव्हाण यांनी रस्ता मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या खोबरेकर यांचे विशेष कौतुक केले.
































































