चिपळूणमधील डेंग्यूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आरोग्य विभाग ‘आपल्या दारी’ मोहिम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूणमध्ये डेंग्यूसदृश विषाणू आढळून येत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह बालकेसुध्दा आजारी पडत आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव थांबावा म्हणून नगरपरिषद प्रयत्न करत आहे.

आज नगरपरिषदमधील आरोग्य विभागाने आरोग्य विभाग आपल्या दारी या मोहिमेच्या माध्यमातून रुग्ण सापडलेल्या दहा ठिकाणी पाहणी केली. नवीन भैरी देऊळ परिसर, राऊत आळी, बापट आळी या भागात आरोग्य सभापती शशिकांत मोदी, नगरसेविका संगीता रानडे, नगरसेविका रसिका देवळेकर, आरोग्य निरिक्षक महेश जाधव, वैभव निवाते सुमित भोळे, आशा नर्स सावर्डेकर यांनी पाहणी केली. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी हेग्यूसदृश विषाणू आढळून आले. त्या ठिकाणी लगेचच फवारणी करण्यात आली. पावडरही टाकण्यात आली.

बिल्डींगसमोरील तसेच मागील बाजूस असणारी पाणी साठण्याची ठिकाणे, बादल्या, दगडी हौद या सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. तसेच डेग्यूसदृश विषाणूबाबत तेथील नागरिकांनी माहिती दिली. नगरपरिषद आरोग्य विभागाने डेंग्यूपासून बचावासाठी आरोग्य विभाग आपल्या दारी ही मोहिम राबवली म्हणून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.