लष्कराच्या चिता हेलिकॉप्टरचे एक्सप्रेसवेवर इमर्जन्सी लँडिंग

641

हिंदुस्थानी हवाईदलाचे ‘चिता’ हेलिकॉप्टरचे चक्क पेरिफेरल एक्सप्रेस-वेवर एमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरला उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एक्सप्रेस-वेवर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. त्यानंतर हे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर सुखरूप परतले.

बागपतच्या एक्सप्रेस वेवर इमर्जन्सी लँडिंग करावे लागलेल्या चिता हेलिकॉप्टरने हिंडन एअरबेसहून उड्डाण केले होते. . परंतु, बागपतमध्ये हवेत असतानाच तांत्रिक बिघाडाची चाहुल लागल्याने हेलिकॉप्टरचे एक्सप्रेस-वे वर आपत्कालीन लॅन्डिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरचे पायलट आणि को-पायलट सुरक्षित आहेत. हिंदुस्थानी हवाईदलाचे हायटेक चिता हेलिकॉप्टर बहुउद्देशीय विमान म्हणून लष्करासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे. पण गेल्या काही महिन्यांतील तांत्रिक बिघाडांमुळे हवाईदलाच्या चिंतेत भर पडली आहे. यापूर्वीच्या दोन अपघातांत सापडलेल्या चिता हेलिकॉप्टर्समधील बिघाडांचे निदान करण्यात हवाई दलाचे अभियंते व्यस्त आहेत.

चिताचे यापूर्वीचे दोन अपघात

  • यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात 3 फेब्रुवारी चिता हॅलिकॉप्टरला अपघात झाला होता. रुद नाल्याजवळ हे हॅलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. दोन्ही पायलट या घटनेत सुखरुप बचावले होते. त्यांनी प्रशिक्षणासाठी हेलिकॉप्टरसहीत उधमपूरहून उड्डाण घेतले होते.
  • गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भूतानमध्ये लष्कराच्या चिता हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या घटनेत मात्र दोन्ही पायलटना आपले प्राण गमवावे लागले होते. दुर्घटनेत शहीद झालेले हिंदुस्थानी हवाईदलाचे पायलट लेफ्टनंट कर्नल रँकचे अधिकारी होते. तर दुसरे पायलट हे हिंदुस्थानी सेनेसोबत ट्रेनिंग घेणारे भूतानी लष्कराचे अधिकारी होते.
आपली प्रतिक्रिया द्या