सिडकोच्या लाचखोर अधीक्षक अभियंत्यासह दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिडको नोडल ऑफिसची दुरूस्ती केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्या करीता आवश्यक असलेल्या इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर स्वाक्षरी करण्याकरीता 15 हजारांची लाच मागणाऱया सिडकोच्या अधीक्षक अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे सिडकोच्या कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सिडकोचा अधीक्षक अभियंता प्रकाश मोहिले आणि सेवानिवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय डेकाटे यांचा समावेश आहे. ही कारवाई लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली.