
हिंदुस्थानात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. याचे कारण म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे जास्त मीठ खाल्ले जाते. खारट पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय जे लोकं जास्त तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खातात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. यामुळे ब्लॉकेज होऊन रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत रक्ताला हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप बळ द्यावे लागते, याला उच्च रक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. उच्च रक्तदाबामध्ये रक्तवाहिन्या प्रभावित होतात आणि त्याचा दाब हृदयावर पडतो. प्रत्येक घरात एक तरी बीपीचा पेशंट असतोच. त्यांना असलेली पथ्य पाणी सांभाळताना बाकीच्यांचे हाल होतात. या गंभीर आजारावर एक छोटी वस्तू तुमची मदत करेल. प्रत्येक स्वयंपाकघरात मसाल्यांच्या डब्यामध्ये दालचिनी असते. दालचिनी उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. तुमची BP ची गोळी दालचिनीच बंद करेल. कसे ते पाहुयात.
एका संशोधनात, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी असल्याचे आढळले आहे. दालचिनीमध्ये Cinnamomum zeylanicum नावाचा एक घटक असतो,जो उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी प्रभावीपणे कार्य करतो. हा घटक रक्तवाहिन्यांच्या भिंती पसरवते आणि रक्त परिसंचरण आरामात करते. तसेच, हे एक संयुग आहे जे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल विरघळवण्यास मदत करते, त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत होते.
हाय बीपीमध्ये दालचिनीचे सेवन कसे करावे –
तुम्ही बीपीमध्ये दालचिनी अनेक प्रकारे सेवन करू शकता. पण, त्याचा चहा सर्वात प्रभावी आहे. हा चहा बनवण्यासाठी दालचिनी बारीक करून पाण्यात उकळा नंतर कपमध्ये गाळून घ्या. आता यामध्ये मध घालून सेवन करा. हे प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित आणि कमी होण्यास मदत होते.
आमटीच्या फोडणीत दोन दालचिनीचे तुकडे नित्यनेमाने घाला. हृदयविकार नियंत्रणात राहील.
गरम दुधात चमचाभर दालचिनी पावडर आणि मध घाला, आणि प्या. सर्दी खोकलाही कमी होईल.
दालचिनीसोबत ही फळेही उपयोगी
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी केळी जरूर खावी, या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आढळते, ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या कमी होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण संत्री खातो, कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. संत्र्यामध्ये लिंबूवर्गीय ऍसिड असते आणि ते रक्तदाब वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही’ हे आपण अनेकदा ऐकले आहे. हे अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, तसेच रक्तदाब रुग्णांसाठी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही.



























































