
उरण तालुक्यातील ओएनजीसीमध्ये तैनात असलेला सीआयएसएफ जवान सोमवार ता.13 जानेवारी पासून बेपत्ता झाला आहे. वाल्मिक ज्ञानेश्वर देवरे (30) असे या जवानाचे नाव आहे. उरण डाऊरनगर येथिल साई समर्थ अपार्टमेंटमध्ये तो आपल्या कुटूंबासह रहात होता. मात्र सोमवार पासून तो बेपत्ता झाला आहे. तो अद्याप घरी आलेला नाही. त्याची पत्नी रूपाली देवरे यांनी या बाबत उरण पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली आहे.
दोन वर्षापूर्वी जेएनपीटी मधून ड्यूटीवर असलेल्या एक सीआयएसएफचा जवान बेपत्ता झाला होता त्याचा अद्याप पत्ता लागला नाही. आत्ता पुन्हा एकदा ओएनजीसीतील जवान बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. या बाबत पोलिसांकडे चौकशी केली असता घरगुती वादामुळे हा जवान घरातून निघून गेला असल्याचे सांगितले.



























































