आझाद आणि क्रॉस मैदानावर स्वच्छतागृहांचा अभाव, संयुक्त बैठकीतून तातडीने मार्ग काढण्याची गरज; मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानावर मूलभूत सोयीसुविधांचा प्रचंड वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे. या मैदानांवर स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने खेळाडू आणि नागरिकांची मोठी कुचंबणा होत असून, या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन मार्ग काढावा, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली.

विधान परिषदेत बोलताना मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईतील महत्त्वाच्या मैदानांच्या दुरावस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल, शिवाजी पार्क येथे कोठेच टॉयलेटची सुविधा नाही. याविषयी पत्रव्यव्हार करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही टोलवाटोलवी होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांनी यासंदर्भात राउंड घेऊन प्रश्न सोडवावा.”