सर्टिफिकेटच्या वादातून सोसायटी सदस्यांत रक्तरंजित राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळोजा सेक्टर 2 येथील एका गृहसंकुलात शेअर सर्टिफिकेटच्या वादातून रक्तरंजित राडा झाला. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव सिंग, पूजा पितळे, जितेंद्र पितळे अशी जखमींची नावे आहे. घटनेनंतर हल्लेखोर सिंग कुटुंब फरार आहे.

ऑलिव्ह पॅराडाईस सोसायटीमध्ये काही रहिवासी उभे होते. त्याचवेळी सोसायटीतील एका महिलेने केलेल्या टिप्पणीमुळे वाद झाला. याच दरम्यान शशी सिंग याने गौरव सिंग यांना मारहाण केली. इमारतीतील रहिवाशांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवले. मात्र काही वेळातच पुन्हा शिवीगाळ सुरू झाल्याने वाद आणखी उफाळला. शशी सिंग याच्या दोन मुलांनी चाकू, कोयत्याने वार करून पूजा आणि जितेंद्र पितळे या दाम्पत्याला जखमी केले. याप्रकरणी शशी सिंग, त्याची पत्नी व दोन मुलांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.