नगर शहरात दोन गटांमध्ये राडा, राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी

नगर शहरातील एकविरा चौकामध्ये शनिवारी दोन गटात तुफान राडा झाला. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप हे घटनास्थळी दाखल झाले. तोफखाना पोलिसांचे विशेष पथक सुद्धा या ठिकाणी हजर झाले आहे. खासगी रुग्णालयात अंकुश याच्यावर उपचार सुरू असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, घटनास्थळी दगडफेकही झाल्याची माहिती समोर आली आहे. असून नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे अद्याप पर्यंत समजले नाही पोलीस त्याचा शोध घेत आहे. अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात ही घटना घडली आहे. दरम्यान परिसरात तणावाचं वातावरण आहे.