जागेचा वाद विकोपाला गेला, धावत्या मेट्रोत दोन महिला भिडल्या; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

जागेच्या वादातून मेट्रोमध्ये दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. धावत्या मेट्रोतच दोघी महिलांनी एकमेकींचे केस ओढत एकमेकींना मारहाण केली. मेट्रोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिल्लीतील मेट्रोमध्ये सदर हाणामारीची घटना घडली आहे. बसायला पुरेशी जागा असतानाही दोन महिला जागेवरून एकमेकींशी वाद घालू लागल्या. पाहता पाहता वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. दोघींनी एकमेकींचे केस ओढले, चापट मारली. यानंतर एका महिलेने दुसरीला सीटवर ढकलले. अन्य एका महिलेने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला यश आले नाही. एका प्रवाशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.