माउंट एव्हरेस्टवर जोरदार हिमवृष्टी, 1000 गिर्यारोहक अडकले; बचाव कार्य सुरू

हिमवादळामुळे माउंट एव्हरेस्टवर सुमारे 1000 पर्यटक अडकले. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत गावकरी आणि बचाव पथकांनी 350 गिर्यारोहकांना बाहेर काढण्यात आले आहे. तिबेटमधील माऊंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील बाजूला 4,900 मीटरपेक्षा अधिक उंचीवरील शिखरावर बर्फवृष्टी झाल्याने रस्ते बंद झाले आणि गिर्यारोहक अडकले.

तिबेटमधील माऊंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील बाजूस शुक्रवारी सायंकाळपासून हिमवृष्टी सुरू आहे. अडकलेल्यांपैकी 350 गिर्यारोहकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून बचाव कार्य अद्याप सुरूच आहे. गिर्यारोहकांमध्ये माऊंट एव्हरेस्ट लोकप्रिय असून मोठ्या संख्येने गिर्यारोहक येथे ट्रेकिंगसाठी येतात. बर्फवृष्टीमुळे गिर्यारोहणाचे कार्यक्रम तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात तापमान अनुकूल असल्याने एव्हरेस्टवर आणि आसपास चढाई करण्यासाठी सर्वात सुरक्षित मानला जातो.