मुख्यमंत्र्यांची ‘रॉयल’ राईड विना पीयूसी प्रमाणपत्रामुळे वादात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्षा ते विधान भवन’ हा प्रवास दणदणीत ‘रॉयल एनफिल्ड’ मोटरसायकलवरून केला; पण मुख्यमंत्र्यांच्या एनफिल्ड मोटारसायकलचे पीयूसी प्रमाणपत्रच ‘एक्सपायर’ झाल्याचे समोर आल्याने मुख्यमंत्र्यांची ‘रॉयल’ राईड वादात सापडली आहे.

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा शपथविधी आज विधान भवनात पार पडला. या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला नेहमीचा वाहनांचा ताफा न घेता रॉयल एनफिल्ड 350 या मोटरसायकलचा पर्याय निवडला. ‘वर्षा’वर मोटरसायकलला किक मारून फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांना सोबत घेऊन थेट विधान भवनात दाखल झाले. कोणत्याही प्रकारे अडचणीत येऊ नये म्हणून या दोघांनीही हेल्मेट घातले होते. मात्र या गाडीचे एक्सपायर झालेले पीयूसी प्रमाणपत्र काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक्सवर पोस्ट करीत हा एक्सपायर माल चालतो का? असा टोला फडणवीसांना लगावला आहे.

– विधान भवनातील शपथविधी आटोपून फडणवीस

मोटरसायकलने मंत्रालयात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पादचाऱयांना अडवून ठेवले. फडणवीसांचा ताफा जाईपर्यंत कोणालाही सोडले नाही. यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांत नाराजी व्यक्त केली.