भाजप वॉशिंग पावडर वापरत नाही, विकासाचे डॅशिंग रसायन वापरते!

777

आम्ही कोणही वॉशिंग पावडर वापरत नाही, तर आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टीकेचा समाचार घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे भ्रष्ट लोक भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ कसे होतात, भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे, असा उपरोधिक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. या उपरोधिक टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

महाजनादेश यात्रा स्थगित

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. 26 ऑगस्टपासून नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होईल.

आपली प्रतिक्रिया द्या