राज्याच्या तिजोरीवर ताण तरीही देवाभाऊ म्हणतात, ‘लाडकी बहीण’ योजना पाच वर्षे सुरूच राहणार

राज्यात सुरू असलेली ‘लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्षे सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. रक्षाबंधनानिमित्त मुलुंडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेचा अनेक सरकारी कर्मचाऱयांनी गैरफायदा घेतला, निकष तोडून अनेकांनी योजनेचे पैसे लाटले, हजारो पुरुषांनीही या योजनेचे पैसे खिशात घातले. या सर्व प्रकारामुळे सरकारच्या तिजोरीवर नाहक आर्थिक ताण पडला. ही योजना बंद पडली तर रोष वाढेल याची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ही योजना बंद पडणार नाही.