मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

469

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे हेलिकॉप्टर अपघातांची इडापिडा सुरूच आहे. आज पेण-बोरगाव येथे प्रचारसभेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा अपघात झाला. हेलिकॉप्टर लॅण्ड करताना चाक चिखलात रुतले व पायलटचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा प्रसंग ओढवला. मात्र पायलटने चपळाई दाखवत हेलिकॉप्टर पुन्हा उडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

नगर जिह्यातील कर्जत येथील सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेण येथे प्रचारसभेला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. सायंकाळी 4 काजून 25 मिनिटांनी पेण-बोरगाक येथे मुख्यमंत्र्यांचे सात टन कजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. मात्र परतीच्या पावसाने हेलिपॅडवर चिखल झाल्याने त्यावर लॅण्डिंग करताना हेलिकॉप्टरचे चाक रुतले. हेलिकॉप्टरकरील नियंत्रण सुटत असतानाच पायलटने प्रसंगावधान राखून ते पुन्हा हवेत उडवले. दिशा बदलून हेलिकॉप्टर लॅण्ड केल्यानंतर मुख्यमंत्री सुखरूपपणे प्रचारसभेच्या दिशेने रवाना झाले. यापूर्कीही फडणवीस लातूर, अलिबाग येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले होते.

पोलीस म्हणतात ही किरकोळ घटना
पेण येथे घडलेली दुर्घटना हा अपघात नसून किरकोळ घटना आहे. हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या