जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दुष्काळाचा आढावा घ्या, पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रदिनीच झालेला नक्षलवादी हल्ला आणि राज्यातील दुष्काळाचे निवारण करण्यासाठी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. नक्षलवादी हल्ल्यात शहीद जवानांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली, मात्र मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता शिथिल करण्याबाबत पाठविलेल्या पत्रावर निवडणूक आयोगाकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने कोणताही नवीन निर्णय घेण्यात आला नाही. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन केवळ दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्राला प्रतिसाद मिळालेला नसला तरी राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्र्यांनी आपापल्या जिह्यात जाऊन दुष्काळ निवारणाच्या कामाचा आढावा घ्यावा, असे आदेश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले. याबाबातची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी परिकहनमंत्री दिकाकर राकते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदी याकेळी उपस्थित होते.

परवानगी नसली तरी लोकप्रतिनिधी म्हणून जाणार
आचारसंहितेच्या काळात अद्याप निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर दिलेले नाही. परवानगी नसली तरी पालकमंत्री दुष्काळी भागातील सरकारी अधिकाऱ्यांना बोलावू शकत नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून जाण्याचा, तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यानंतर परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे निकेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊ, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

रेल्वेने पाणी देण्याची अद्याप वेळ नाही
संपूर्ण मराठवाडय़ात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, नगर, विदर्भातील बुलढाणा, पश्चिम महाराष्ट्रातील माण, खटाव या भागात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंतचे पाणी, चारा आदींचे नियोजन झाले आहे. त्यामुळे सध्या तरी रेल्वेने पाणी पुरविण्याची वेळ येणार नाही. 10 जूनपर्यंत पाऊस सुरू झाल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील, असे पाटील म्हणाले.