
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना ‘राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. ओढाताण होतेय, पण महाराष्ट्राची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र सुरू नाही’, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांची ‘ही’ ओढताण हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत देखील दिसून आली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीत फार पैसा नसल्याची कबूली दिली आहे.
”महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे. 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र (Maharashtra Economey) हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या तिजोरीत खूप पैसे नसले तरी आजघडीला महाराष्ट्र हा सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

























































