आई-बाबाचं ऐकायचं…तीन वर्षांच्या अंशिकाला उद्धव काकांची सूचना

3166

राज्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि निसर्ग वादळाने केलेल्या नुकसानीचा राज्य मुकाबला करत आहे. या सर्व परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालून निर्णय घेत आहे. त्यांच्या नेतृत्वाचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या चाहत्यांमध्ये एका तीन वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळातवेळ काढून या आपल्या चाहतीला फोन केला आणि तिचे काका बनून तिला काही सूचना केल्या. राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव काकांनी केलेल्या सूचनाचं पालन करणार असल्याचं आश्वासनंही तिने उद्धव काकांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या या छोट्या चाहतीचे नव आहे अंशिका शिंदे.

पुण्यातील विश्रांतवाडीतील विश्रांत सोसायटीत रहाणाऱ्या शिंदे कुटुंबांला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला तेव्हा सुखद धक्का बसला. अंशिका शिंदे या तीन वर्षाच्या लहान मुलीचा एक व्हिडीयो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीयोत लॉकडाऊनदरम्यान आईने केलेल्या सूचना पाळल्या नसल्याने आई तिला दम देत असल्याचे दिसते. त्यावेळी छोटी अंशिका रडत आपण पुन्हा अशी चूक करणार नाही असं सांगिते. माय-लेकींच्या या संस्कार शिकवणीत अंशिकाची आई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय सूचना केल्या आहेत, याची माहिती अंशिकाला देते. तसेच त्यांचं कसं पालन करायचं याची माहिती देते. हे सर्व ऐकल्यानंतर आपण पंतप्रधान मोदींचं आणि उद्धव काकांचं एैकणार असं अंशिका सांगते. तसेच आपल्याला उद्धव काका खूप आवडतात असंही ती आईला सांगिते. छोट्या अंशिकाचा हा व्हिडीयो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही पोहचला. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या छोट्या चहातीला फोन करून सुखद धक्का दिला.

तुला आई-बाबा दम देतात का, असा प्रश्न करत मुख्यमंत्र्यांनी संवादाला सुरुवात केली. तसेच यापुढे तुला कोणीही ओरडणार नाही. फक्त आईबाबांनी सांगितलेलं एकायचं, असं मुख्यमंत्र्यांनी अंशिकाला सांगितले. आपण आईबाबाचं ऐकणार असल्याचे अंशिका म्हणाली. तसंच अंशिकाला दम न देता तिला शांतपणे समजवा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अंशिकाच्या आईवडिलांना केली. तसेच काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केले. त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वसामान्य नागरिकांशी कसं विश्वासाचं नातं जुळलंय हेच यातून दिसून येतंय.

आपली प्रतिक्रिया द्या