
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्करातील जवान, अधिकारी या सर्वांना 73 व्या लष्कर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुभेच्छा संदेशात म्हणाले की, सदैव सज्ज, सावध आणि सतर्क जिगरबाज जवान आणि लष्करातील माझ्या बांधवांना मानाचा मुजरा! तुम्ही आहात, म्हणून आम्ही इकडे निश्चिंत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना संकट काळातही तुम्ही सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. तुम्हा सर्वांना भारतीय लष्कर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांच्या त्याग, समर्पणाला सलाम. तुमचे शौर्य, धैर्य यांच्याप्रति आम्ही सदैव कृतज्ञच राहू या विनम्र ग्वाहीसह भारतीयलष्करदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

























































