Live -आमच्यावर महाराष्ट्राची जबाबादारी आहे तसाच महाराष्ट्राचा आमच्यावर विश्वास आहे – उद्धव ठाकरे

1973
cm

 • जनजीवनाची गाडी पूर्वपदावर येण्यासाठी सहाय्य करा
 • लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवूया आता आपण सर्व हळू हळू सुरू करुया
 • स्वत:ची काळजी कशी घ्यायची हे शिकवलं आहे.
 • कोरोनाने आपल्याला जगायचं कसं ते शिकवलं
 • कोरोनासोबत जगायचं म्हणजे काय, सतत मास्क वापरणे, खोकताना शिंकताना काळजी घेणे, सॅनिटायझर वापरणे, रस्त्यावर थुंकू नये,
 • लॉकडाऊन अचानक उठवणं चुकीचं आहे.
 • कोरोनाचा व्हायरस जोरात गुणाकार करतोय
 • लॉकडाऊन राहणार की नाही हा फक्त हो किंवा नाहीचा प्रश्न नाही.
 • या अडचणीच्या वेळी मी राजकारण करणार नाही.
 • आम्हाला जीएसटीचा पैसा आला नाहीए मग आता बोंब करू का?, रेल्वेचा पैसा आला नाहीए
 • त्यामुळे कृपया राजकारण करू नका
 • आमच्यावर महाराष्ट्राची जबाबादारी आहे तसाच महाराष्ट्राचा आमच्यावर विश्वास आहे –
 • कोणालाही आपण वाऱ्यावर सोडणार नाही
 • सर सलामत तो पगडी पचास
 • आपण 75 टक्के ते 80 टक्के कापूस खरेदी केली आहे.
 • शेतकऱ्याला बांधावरतीच बि बियाणं खतं कशी उपलब्ध होतील याचा विचार सुरू आहे,
 • शेती ही चालू राहिलीच पाहिजे
 • लवकरच चित्रिकरणाला परवानगी देण्याचा विचार करतोय
 • 50 हजाराच्या आसपास उद्योग सुरू केले आहेत. तर सहा लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत
 • पुढल्या पंधरा दिवसात आपल्या देशाचं खरं चित्र समोर येईल
 • शाळा पुढे गेल्या तरी शिक्षण कसं सुरू करायचं याचा विचार सुरू आहे.
 • एअरपोर्ट सुरू करायचं पण आम्हाला त्याआधी थोडी खबरदारी घ्यायची आहे.
 • एसटीच्या माध्यमातून 3 लाख 80 हजार लोकांना इच्छित स्थळी सोडले. त्यावर 75 कोटी खर्च झाला.
 • एसटीच्या 5 मे ते 23 मे पर्यंत 32 लाख फेऱ्या झाल्या आहेत.
 • एसटीने देखील मोठं काम केलं आहे. दिशाहिन जाणाऱ्या मजूरांना त्यांच्या अपेक्षित ठिकाणी सोडलं
 • रोजी 80 ट्रेन्सची मागणी करतोय पण आपल्याला अवघ्या 30 ते 40 ट्रेन्स मिळतायत
 • राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन सोडल्या आहेत. सहा ते सात लाख मजूरांची सोय केलेली आहे.
 • ट्रेन्स आपण लॉकडाऊनच्या आधी मागत होतो. आता हे संकट वाढल्यानंतर हे ट्रेन सुरू केल्या
 • पॅकेज काय आहे ते घोषित करायचं? जाहीरात करायचं? की फक्त मदत करायची, प्रत्यक्षात काम करायचं
 • पॅकेज आलं. पण त्या पॅकेज उघडलं तर त्यात काहीच नाही. तो फक्त खोका
 • महापालिकेकडून घरोघरी जाऊन अशी काही लक्षणं आहेत का याचे सर्वेक्षण सुरू असते.
 • आपला प्रयत्न हाच आहे की व्हायरस आपल्याकडे पोहोचायच्या आत आपण त्याच्याकडे पोहचायचे
 • आजारावर औषध नसलं तरी वेळेत उपचार घेतले तर हा आजार लवकर बरा होतो
 • वेळेत उपचार घेतल्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात
 • ही लक्षणं समोर आल्यानंतर तत्काळ डॉक्टरकडे जा.
 • सर्दी खोकला ताप याच्यासोबतच तोंडाची चव जाते, थकवा जाणवते, वास येत नाही ही देखील कोरोनाची प्राथमिक लक्षणं आहेत.
 • पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या आजारांपासून लांब राहा
 • पावसाळात खबरदारी घ्यायची आहे. उगाच पावसात भिजू नये, पाणी उकळून प्यावे,
 • महाराष्ट्राच्या रक्तात लढण्याची जिद्द कशी आहे ते दाखवून द्यावं
 • पुन्हा एकदा रक्तदानाची गरज, सध्या फक्त 8 ते 10 दिवस पुरेल एवढेच रक्त आहे.
 • फिल्ड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्सची ऑक्सिजनची सोय करतोय
 • रुग्णांची आबाळ होतेय हे सत्य आहे. मात्र हे रुग्ण फार मोठे आहे. आता आपल्याकडे फिल्ड हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.
 • आपण काही लाखांमध्ये रुग्णशय्या तयार केल्या आहेत.
 • या पुढची लढाई अधिक बिकट होणार, केसेस वाढण्याची शक्यता आहे.
 • साडे तीन लाखाच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत.
 • एकूण आकडा जरी 47 हजार असला तरी 13 हजार 47 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत
 • महाराष्ट्रात 33 हजार 786  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 • सव्वा लाख रुग्ण अपेक्षित होते मात्र आता प्रत्यक्षात 33 हजार रुग्ण आहेत.
 • किमान दीड लाख रुग्ण महाराष्ट्रात होऊ शकतो अशी भीती केंद्रीय पथकाने व्यक्त केली होती.
 • गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढली आहे,
 • काही जणांना या परिस्थितीचं गांभिर्य नाहीए
 • ईदच्या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो की ईद घऱातल्या घरात प्रार्थना करा. कोरोना लवकर नष्ट होवो अशी दुआ मागा
 • होळीनंतर कोरोनाची बोंबाबोंब सुरू झाली त्यामुळे आपले सर्व सण शांततेत साजरे केले
 • मी नियमित आपल्यासमोर येतोय. आपले धन्यवाद करतोय. त्यासोबतच कोरोनाबाबतचे अपडेट देतोय
आपली प्रतिक्रिया द्या