निसर्ग चक्रीवादळ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, परिस्थितीचा घेतला आढावा

538

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे शुक्रवारी दुपारी मुंबईहून मांडवा, अलिबाग येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह हे उपस्थित होते.

सामना अग्रलेख – बदललेली वादळवाट… ‘निसर्ग’ आहे साथीला!

उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गावांना भेट दिली. थळ येथे पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यावर मुख्यमंत्री अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

img-20200605-wa0006_copy_700x450

3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. या वादळात रायगड जिल्ह्यातील 12 तालुक्यात मोठे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली, विजेचे पोल पडले, घरांची पडझड झाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

img-20200605-wa0003

आपली प्रतिक्रिया द्या