Video – समृध्दी महामार्गाची वाहतूक मे महिन्यापासून शिर्डीपर्यंत – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्वाही

>> अनिल कुचे

येत्या मे महिन्यापर्यंत नागपूर मुंबई समृध्दी महामार्गाचे काम शिर्डी पर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर येणार्‍या वर्षात मुंबई पर्यंत हा मार्ग वाहतूकीसाठी सुरू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या शिवणी रसलापूर येथे समृध्दी महामार्गाचे पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. समृध्दी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.

बाळासाहेबांच्या नावाने असलेल्या समृध्दी महामार्ग देशातील सर्वात चांगला महामार्ग म्हणून ओळखल्या जाईल यासाठी त्याची पाहणी करणे गरजेचे होते. या महामार्गाचे काम कश्या पध्दतीने सुरू आहे. व ते चांगल्या पध्दतीने होत आहे का याची पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. देशभर्‍यात सध्या कोरोनाची लागण असल्यामुळे राज्यातील महामार्गाचे काम या काळातही सुरू होते. येत्या 1 मे पर्यंत समृध्दी महामार्गाची वाहतूक शिर्डीपर्यंत सुरू होणार आहे. त्यानंतरच्या एका वर्षात मुंबईपर्यंत वाहतूक सुरू होईल. नागपूर मुंबई महामार्गाचे अंतर 8 तासाचे राहणार आहे. कमीत कमी वेळात मुंबईपर्यंत पोहोचता यावे यासाठी या समृध्दी महामार्गाची निर्मिती करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. शिवणी रसलापूर येथे रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॅप्टरने रवाना झाले तत्पूर्वी त्यांचे आज सकाळी नागपूर येथे आगमन झाल्यानंतर हेलिकॅप्टरनेच शिवणी रसलापूर येथे पोहोचले त्यांच्यासोबत अमरावतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या