पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

437

लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, प्रजेच्या सुखासाठी अहिल्यादेवींनी दानधर्माच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली. जी आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभी आहेत. त्यांनी प्रजाहितदक्षतेचा प्रेरणादायी वारसा आपल्याला दिला आहे. अशा शौर्य, धैर्य, न्यायाच्या मुर्तीरूप अहिल्यादेवींना कोटी कोटी प्रणाम.

आपली प्रतिक्रिया द्या