Live – निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

  • मंत्रालयात पिक अव्हरची विभागणी केली जाणार
  • ज्यांनी शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल  केले आहेत.
  • डेलकर हे केंद्रशासित प्रदेशातून होते त्यामुळे मी पंतप्रधान व ग़ृहमंत्र्यांना विनंती करतो की मुंबई पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश द्या
  • डेलकरांची बाजू का कुणी मांडत नाही? डेलकरांसाठी का कुणी रस्त्यावर उतरत नाही
  • त्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावं असतील तर त्यांचेही राजीनामे घेणार का?
  • त्या आत्महत्येमध्ये १३ -१४ पानांची सुसाई़ड नोट आहे. एका सात टर्मच्या खासदाराने आत्महत्या केली. पण त्याच्या सुसाईड नोटची दखल घेतली नाही.
  • गेल्या आठवड्यात आणखी एक आत्महत्या झालेली आहे. त्यावर कुणीच बोलत नाही.
  • त्यामुळे यात कुणीही आतातायी पणा करू नये. पुरावे तपास यंत्रणेकडे द्या.
  • पूजा चव्हाणच्या आई वडिलांची हीच मागणी आहे की आमच्या मुलीची बदनामी थांबवा
  • तपास य़ंत्रणेलाच विरोधकांनी खोटे ठरवले आहे – उद्धव ठाकरे
  • विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही.
  • देश विकायला काढणारे अशी भाजपच्या सरकारची ओळख तयार होणार आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी मला फुकटचे सल्ले देऊ नये – उद्धव ठाकरे
  • पूजाच्या आई वडिलांचा सरकार व तपास यंत्रणेवर विश्वास आहे.- उद्धव ठाकरे
  • फक्त संशय़ावरून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये – पूजाचे आई वडिल
  • संजय राठोड यांच्या राजीनाम्य़ाची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही – पूजा चव्हाणचे आई वडिल
  • पूजाचे आई वडिल मला भेटले.  त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मला एक पत्र लिहलं आहे.
  • ही तपास यंत्रणा तीच आहे जी तुमच्या सरकारच्या वेळी होती. मग आता अविश्वास का दाखवता?
  • पण ती चौकशी होण्याआधीच विरोधकांची आदळाआपट सुरू आहे.
  • आम्ही कुणालाही पाठिशी घालणार नाही.
  • प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. इतके दिवस का लावले असा विचार तुम्ही करत असाल.ज्या क्षणी ही घटना घडली त्या क्षणापासून आम्ही निपक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेश दिले. कालबद्ध तपास करा व अहवाल आम्हाला द्या,
  • संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे.
  • एखाद्याला अडकवायचं आहे, लटकवायचं आहे असं झालं नाही पाहिजे.
  • तपास झाला पाहिजे मात्र तो निपक्ष:पातीपणे झाला पाहिजे
  • मात्र गेल्या काही महिन्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे.
  • सरकार चालवताना आमची जबाबदारी असते न्यायाने वागणे
  • का नाही केंद्र सरकारच्या इथे जाऊन बोंबलत
  • खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं असं झालं आहे.  ही बोलघेवडी माणसं आहेत.
  • विरोधक पेट्रोल डिझेल दरवाढीवर गप्प का? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • त्यांनी अशा प्रकारे कर लावला आहे की त्याने राज्याला काहीच मिळणार नाही.
  • डिझेल पेट्रोलचे दर वाढतायत त्यासाठी आंदोलन का केलं जात नाही.
  • जीएसटीचे २९ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे.
  • मराठा आरक्षणात त्यांनी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही देऊ असे  सांगितले. त्यावरून आम्ही त्यांचे आभार मानतो
  • सीमाप्रश्नावर आपण सर्व एकत्र आहोत असे ते बोलले. केंद्रात व कर्नाटकात तुमचं सरकार आहे. मग विचारा जाब त्यांना.
  • ज्या लढ्याचं, धारावी पॅटर्नचं जगभरात कौतुक झालं. कोविड योद्ध्यांचं शोौर्य तुम्ही नाकारत आहात. हा विरोधी पक्षाचा दुतोंडी पणा आहे.
  • कोविडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मला त्यांची कीव येते. काय परिस्थिती होती. आपण कसा मार्ग काढला. ते आपण त्यांच्या समोर ठेवले आहे. पण तरिही ते असे आरोप करतात.
  • विरोधी पक्षाने आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काही आरोप केले. मात्र आरोपांना काही तथ्य असलं पाहिजे ना?
  • ८ मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल.
  • कुठेही काही कमी पडू न देण्याच्या जिद्दीने प्रयत्न करतोय
  • मी व सरकार प्रयत्न करत आहोत. दुसरी लाट जास्त वाढू न देता थोपविण्याचा प्रयत्न करतोय़.
  • गेल्या वर्षी याच वेळी कोविडने प्रवेश केला होता. अजुनही कोरोनाचा धोका गेलेला नाही. तो अजुन वाढताना दिसतोय
  • उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.