शिरोळ नृसिंहवाडीतील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ येथील नृसिंहवाडी येथील पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली असून या भागाची पाहणी केली आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील ,आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदि उपस्थित होते.

कोकणासह कोल्हापूरमध्येही पूरस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी शरोळ येथील नृसिंहवाडी भागाल भेट देत पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी
येथील समस्या जाणून घेतल्या.

शिरोळ-नृसिंहवाडीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री दुपारी 1 वाजता ते शाहूपुरी 6 वी गल्ली येथे तसेच कोल्हापूर नाईक अॅण्ड कंपनी व तिथून पुढे पंचगंगा हॉस्पिटल गंगावेश ते शिवाजी पूल येथील झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दुपारी 2.00 वाजता स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार असून त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.