मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निघाले थेट अक्कलकोटच्या बांधावर!

uddhav-thackeray

अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी साडेनऊच्या सुमाराला सोलापुरात आगमन झाले. विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपला ताफा शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्याचे सांगितले. शासकीय ताफा अक्कलकोट तालुक्याच्या दिशेने रवाना झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीकर,  कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांसोबत खासदार विनायक राऊत आदी हजर होते. विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी काही नेत्यांची जुजबी चर्चा केली. चला आपल्याला थेट शेतकऱ्यांना भेटायचे आहे, असे सांगून ताफा अक्कलकोटच्या दिशेने निघण्याचे आदेश पोलिसांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या