एसटी महामंडळाला आधुनिकतेचा साज, बस स्थानकापासून सीएनजी बसेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाच्या बस स्थानकांचे बांधकाम, पुनर्बांधणी व आधुनिकीकरणासह सीएनजीवरील नव्या बसेस आणि डिझेलवर धावणाऱया बसेसचे सीएनजीमध्ये रुपांतर करण्यासाठी एसटी महामंडळाला 298 कोटी 83 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

राज्याच्या यंदाच्या बजेटमध्ये एसटी महामंडळासाठी मोठय़ा घोषणा केल्या होत्या. महाविकास आघाडीने मागील दोन वर्षांत महामंडळातील कर्मचाऱयांच्या वेतनासाठी 4 107 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. एसटी महामंडळात तीन हजार नवीन बसेस व बस स्थानकांच्या दर्जात वाढ, आगारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. एसटीच्या बस आगारांचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. डिझेलच्या वाढत्या किमती व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नव्या सीएनजी बसेसची खरेदी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या बजेटमध्ये महामंडळासाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती.त्यानुसार एसटी महामंडळाला हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.