कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचे 45 टक्के भुयारीकरण पूर्ण

37

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो रेल्वे असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाचे भुयारीकरणाचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गात असलेल्या एकूण 32 भुयारांपैकी 9 भुयारे पूर्ण झाली आहेत.23136 कोटी रुपये खर्चाच्या या 33.5 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना शहराच्या एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत प्रवास करणे सुलभ होणार आहे.

या मेट्रो-3 मार्गातील आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हा पहिला टप्पा 2021 पर्यंत सुरू होणार आहे. त्यानंतर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते कफ परेड हा दुसरा टप्पा आहे. 23.69 किलोमीटरचे भुयारीकरण गेल्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाले आहे अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून देण्यात आली. भुयारीकरणाच्या कामासाठी विविध ठिकाणी 17 टनेल बोअरींग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरवण्यात आल्या आहेत.

गेल्या मार्च महिन्यात गोदावरी-1 या टीबीएम मशिनद्वारे डोमेस्टीक एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतचे 2.9 किलोमीटरचे भुयारीकरण अवघ्या 455 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे मेट्रो-3 मार्गादरम्यान मीठी नदीखालूनही भुयारीकरण करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या