
सामना ऑनलाईन । मुंबई
तापमानात घट झाल्याने राज्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी थंडीने पारा घसरल्याने यंदा नागरिकांना दिवाळीत गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे. पुण्यात आज राज्यातील किमान तापमान म्हणजे 14.04 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर -14.8, नगर -15, नाशिक – 15.01, आणि सांगली 15.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पेक्षा पुण्यात किमान तापमानाची नोंद झाली आहे. मान्सून परतल्यावर आभाळ स्वच्छ होते आणि त्याबरोबर हवा कोरडी होऊन तापमान कमी होऊ लागते. ही स्थिती थंडीसाठी पूरक मानली जाते. त्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी राज्यातील थंडी वाढते.
राज्यातील किमान तापमानाची नोंद झालेली शहरे
- पुणे -14.04 अंश सेल्सिअस
- महाबळेश्वर –14.8 अंश सेल्सिअस
- नगर – 15 अंश सेल्सिअस
- नाशिक – 15.01 अंश सेल्सिअस
- सांगली –15.9 अंश सेल्सिअस
- नांदेड –16 अंश सेल्सिअस
- संभाजीनगर – 16.2 अंश सेल्सिअस
- वर्धा – 16.05 अंश सेल्सिअस
- जळगाव – 17.04 अंश सेल्सिअस
- नागपूर –18.05 अंश सेल्सिअस
- मुंबईत – 21.08 अंश सेल्सिअस






















































