
सामना प्रतिनिधी । नगर
नगरसह उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा थंडीची लाट आली आहे. दोन दिवस कमी झालेली थंडी मंगळवारपासून वाढली आहे. त्यामुळे पारा 5.5 अंशांवर घसरल्याने नगरकर पुन्हा एकदा गारठरले आहेत. थंडीची ही लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तविली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची तीव्र लाट राज्यभरात आली होती. जानेवारीच्या सुरुवातीलाही ती जाणवली. त्यानंतर मात्र थंडी कमी झाली होती. आता पुन्हा एकदा किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पुन्हा थंडीची लाट आली आहे. थंडीमुळे शहरात आजारांचे प्रमाणही वाढले आहे. तर गरम कपड्यांना मागणीही वाढली आहे.





























































