हिंदू देवता आणि अमित शहांबद्दल अभद्र भाषा वापरल्याबद्दल कॉमेडियनला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू देवी देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल अभद्र भाषा वापरल्याबद्दल मध्य प्रदेशमध्ये कॉमेडियन मुनव्वर फारुकीला अटक करण्यात आली आहे. फारुकीसह चार अरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कॉमेडियन मुनव्वर फारुके गुजरातमधील जुनागढचा रहिवासी आहे. न्यु इयर निमित्ताने मध्य प्रदेशच्या एका कॅफेत स्टॅण्डअप कॉमेडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुनव्वर फारुकीचा परफॉमन्स होता. या कार्यक्रमला भाजप आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांचे पुत्र एकलव्यही उपस्थित होते.

मुनव्वर फारुकीने आपल्या स्टॅण्डअप परफॉमन्समध्ये हिंदू देवी देवता, गोधरा दंगल आणि केंद्रीय अमित शहा यांच्यावर विनोद करून अभद्र भाषा वापरली. तेव्हा उपस्थित एकलव्य गौड यांने आक्षेप घेतला आणि कार्यक्रम बंद पाडला. नंतर एकलव्य यांनी पोलिसांत मुनव्वर फारुकी विरोधात तक्रार दाखल केली. तसेच पुरावा म्हणून मुनव्वरचा कॉमेडीचा व्हिडीओही दाखवला. पोलिसांनी या प्रकरणी मुनव्वरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.