घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा आयुक्तांवर आरोप; आयुक्त-मनसे कार्यकर्त्यांत महापालिकेत जोरदार राडा

पुणे महापालिकेच्या मुख्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मनसेचे माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे आणि आयुक्त नवलकिशोर राम यांच्यात खडाजंगी झाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर मनसेचे अॅड. शिंदे आणि कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याने महापालिकेत गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात तुम्ही मराठी संस्कृती बदनाम करणारे गुंड असल्याच्या आयुक्तांच्या वक्तव्यामुळे मनसेच्या पदाधिकारी, कार्यकत्यांनी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. पालिकेत मनसे कार्यकर्ते येऊ लागल्याने पाचनंतर पालिकेचे दारे बंद करून घेतले. रात्री उशिरा मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील 20 लाखांचे साहित्य गायब झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराचा शोध घेऊन पोलिसांत गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन देण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे आणि चार कार्यकर्ते साडेचारच्या सुमारास महापालिकेत आले. आयुक्त स्वच्छता अभियानाच्या बैठकीत होते. अॅड. शिंदे यांनी बैठकीत प्रवेश करीत, ‘मीटिंग संपायला किती वेळ लागेल?’ असे विचारले. त्यावर आयुक्त राम यांनी अॅड. शिंदे यांना ‘आप कौन हो?’ असा प्रश्न केला. यावर शिंदे यांनी आपली ओळख सांगत मी माजी नगरसेवक मराठीचा अवमान सहन करणार नाही अॅड. शिंदे मनसेचे माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे म्हणाले, ‘आयुक्त बंगल्यातील साहित्य गायब झाल्याप्रकरणी निवेदन देण्यासाठी आलो होतो. बाहेर काही वेळ थांबल्याने मीटिंग कधी संपणार? हे विचारण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी वेगळ्याच स्वरात बाहेर जायला सांगितले. त्यांनी थेट आमच्याबर गुंड असा आरोप केला. तुला घरात घुसून मारेन, तुला पुण्यातून बाहेर टाकून देईन, अशी धमकी दिली,’ असा आरोप शिंदे यांनी केला. तसेच आयुक्त दालनाबाहेर ठिय्या मारला. काही वेळाने आयुक्तांनी परत आमच्या ठिकाणी येत मराठी भाषेवरून अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ‘आमच्याकडील मोबाईल काढून घेतले, आयुक्तांनी मराठी लोकांना गुंड म्हणणे आम्ही कदापि सहन करणार नाही. महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरील शूटिंग तपासावे. आमच्यावर गुन्हे दाखल करा. तसेच आयुक्तांवरही गुन्हा दाखल करावा, आम्ही मागे हटणार नाही,’ असे अॅड. शिंदे यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी आप बाहर निकलो,’ असे सांगितले.

‘ अॅड. शिंदे यांनी हिंदीतील संवादाला आक्षेप घेत, ‘तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला!’ असे ठणकावले. त्यातून शाब्दिक वाद वाढत गेला. यामुळे संतप्त झालेल्या अॅड. शिंदे आणि कार्यकर्त्यांनी थेट आयुक्तांच्या खुर्चीकडे धाव घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत अॅड. शिंदे यांना रोखले. यावेळी पुढे वाद वाढत जाऊन, ‘महाराष्ट्रबाहेर पाठवीन,’ अशी शिंदे यांची धमकी, तर ‘मी घरात घुसून मारेन,’ अशी आयुक्तांची प्रतिक्रिया समोर आल्याचा आरोप केला गेला. त्यानंतर शिंदे आणि मनसेच्या कार्यकत्र्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर काही वेळाने मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बावर, मनसे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजित शिरोळे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश भोईबार, गणेश भोकरे आदी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. पालिकेत तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. मनसेचे कार्यकर्ते पालिकेत येऊ नयेत म्हणून दारे लावून घेतली. अखेर साडेतीन तासांच्या ठिय्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले,

महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आज निषेध सभा
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना बुधवारी धक्काबुक्की करण्यात आली. त्याचा निषेध करण्यासाठी पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. ७) सकाळी १० वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी महापालिका भवनसमोर निषेध सभा घेणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा
महापालिका आयुक्तांना निवेदन देताना गोंधळ घालणाऱ्या मनसे कार्यकत्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३मधील कलम १३२अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

‘मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात!’
अॅड. किशोर शिंदे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडल्यानंतर आयुक्त मीटिंग रूममधून त्यांच्या दालनात आले. अॅड. शिंदे यांच्याबद्दल माहिती घेत आयुक्त दालनाबाहेर येत अॅड. शिंदे यांच्याशी बैठकीत चुकीच्या पद्धतीने कसे तुम्ही वागलात, हे सांगू लागले. या संवादात आयुक्त राम ‘मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात,’ असे बोलले. या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि वातारवरण चिघळले, या घटनेमुळे महापालिकेच्या राजकारणात नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. विशेषतः वादात भाषा आणि प्रांतीय ओळख या मुद्दांचा समावेश झाल्यामुळे प्रकरण आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

असा अनुभव माझ्या आयुष्यात कधीही आला नाही – आयुक्त
पुणे : ‘महाराष्ट्रात मी अनेक वर्षे काम केले, मात्र, बैठकीदरम्यान कोणीही जबरदस्तीने घुसलेले कधी पाहिले नव्हते. मनसेचे माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, असे वाटत नाही. ते गुंडागर्दी करीत होते. असा अनुभव माझ्या आयुष्यात कधीही आला नाही. मी त्यांच्याविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत,’ असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मनसेच्या राड्यावर दिले.

महापालिकेत मनसे आणि महापालिका आयुक्त यांच्यात बुधवारी झालेल्या वादावर महापालिका आयुक्त राम आणि अॅड. शिंदे यांनी त्यांची बाजू मंडली आहे. आयुक्त राम म्हणाले, ‘मी सकाळपासून मीटिंग घेत होतो. मीटिंग सुरू असताना अचानक तीन-चार व्यक्ती मीटिंगमध्ये घुसल्या. ही मीटिंग कधीपर्यंत चालणार? अशी विचारणा केली. तुम्ही कोण? असे विचारले असता, आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य गायब प्रकरणाची चौकशी शहर अभियंत्याकडे महापालिका आयुक्त बंगल्यात काय काय साहित्य होते आणि काय गायब झाले, याची मला माहिती नाही. मी आयुक्त म्हणून आल्यानंतर माझे बरेच साहित्य आणले होते. साहित्यचोरीचा विषय नाही, भांडार व्यवस्थापनाचा हा विषय आहे. बंगल्यातील साहित्याची माहिती कोणी दिली, याची मला माहिती नाही. हा विषय कसा समोर आला, त्यांनी त्यांची ओळख सांगितली. त्यांनी त्यांचे किंवा त्यांच्या भागातील काम असेल तर सांगायला हवे होते. त्यांना मी थांबवूनही ठेवले नव्हते. सुरुवातीपासून त्यांच्या डोक्यात वेगळी कल्पना होती, असे वाटले. महापालिकेत ४० ते ५० अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना असे वागणे योग्य नाही. त्यांना सर्व प्रकार माहीत आहे. हा प्रशासनाचा अवमान आहे. यावर मला दुखः झाहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे.’

मराठा आणि गुंड असल्याबाबतच्या वक्तव्यावर आयुक्त राम म्हणाले, ‘हिंदीमध्ये तुम बहार चलो, असे बोलल्यामुळे त्यांचा राग वाढला. त्यामुळे मी मराठीबद्दल बोललो. मी त्यांना कोणतीही धमकी दिली नाही. उलट त्यांनी महाराष्ट्राचाहेर काढीन, अशी धमकी दिली. गुंड प्रवृत्तीच्या माणसाबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. मी बीडसारख्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून चार वर्षे काम केले आहे.’

याची चौकशी करायला सांगितली आहे. मला 24 लाखांचे काय साहित्य देणार, याचीही मला माहिती नाही. यानिमित्ताने सुरक्षेचा चिंतेचा विषय आहे. आयुक्त बंगल्यातील साहित्याचे नक्की काय झाले, याची चौकशी करण्याची जबाबदारी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे दिल्याची माहिती आयुक्त राम यांनी दिली.