मुंबईतील गृहनिर्माणविषयक परवानग्यांसाठी समिती

350

मुंबई शहरामधील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पर्यावरणविषयक, गृहनिर्माणविषयक आणि महापालिकांकडून मिळणार्‍या विविध परवानग्या जलदगतीने मिळण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त, गृहनिर्माण सचिव आणि पर्यावरण सचिव यांची समिती गठीत करण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री  जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत स्वमालकीच्या घरात राहण्याचे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. यासाठी लोक मोठी गुंतवणूक करतात, पण अनेकवेळा गृहनिर्माणविषयक मान्यता, पर्यावरणविषयक मान्यता किंवा महापालिकेकडून मिळणार्‍या मान्यता वेळेत न मिळाल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडतात. अनेकवेळा एखाद्या विभागाची मान्यता मिळाली तर दुसर्‍या विभागाची मान्यता रखडलेली असते. असे होऊ नये यासाठी तसेच गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मान्यता समांतरपणे मिळण्याच्या दृष्टीने शासनाच्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या धोरणांतर्गत ही समिती नेमण्यात येत आहे. परवानग्या मिळण्याची प्रकिया गतिमान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जे गृहनिर्माण प्रकल्प विविध आवश्यक निकषांची पुर्तता करतील त्यांना जलदगतीने मान्यता देण्याच्या दृष्टीने ही समिती काम करेल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या