गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्यासाठी समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी गिरणी कामगारांची मागणी आहे. त्यानुसार सरकारने विविध पर्याय तपासण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने आज शासनाने गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.

यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये नगरविकास, वित्त आणि कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबतच्या विविध पर्यायांना अनुसरून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत. तसेच वेळोवेळी बैठका घेऊन आढावाही घेतला जाणार आहे.