‘बिग बॉस’च्या घरात सेलिब्रिटींच्या आधी कॉमन मॅनची होणार एंट्री!

20रियालिटी शो ‘बिग बॉस-15’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात बिग बॉसचे प्रीमियर होणार असल्याची चर्चा आहे. निर्मातेदेखील आतापासून शोच्या तयारीला लागले आहेत. शोचा यंदाचा सिजन तीन ऐवजी सहा महिने चालणार असल्याची चर्चा आहे. तसेच ‘बिग बॉस’च्या घरात सेलिब्रिटींच्या आधी सर्कसामान्यांना एंट्री देणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्कसामान्य स्पर्धकांची निवड ऑडिशनच्या माध्यमातून केली जाणार आहे. शो सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक मतदान करतील आणि भव्य प्रीमियरमध्ये जाण्यासाठी 4-5 सामान्य स्पर्धक निवडतील. शोमध्ये 12 स्पर्धक असणार आहेत. प्रत्येक हफ्त्यात एका स्पर्धकाचे एलिमिनेशन होईल आणि त्याजागी वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे एका नव्या स्पर्धकाची एंट्री होईल.

यांच्या नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरात यंदा वरुण सूद, नेहा मर्दा, भूमिका चावला, दिशा वाकानी, कृष्णा अभिषेक, सुरभी चंदना हे सेलिब्रिटी जाणार असल्याची चर्चा आहे. सलमान खान हाच यंदाच्या सिजनची धुरा सांभाळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या