
हिंदुस्थानची आघाडीची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मीराबाई चानूने महिलांच्या 48 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये 109 असे मिळून एकूण 193 किलो वजन उलत सुवर्णपदकावर आपल्या नावाची मोहर उमवली आहे.
Tokyo Olympics silver medallist Mirabai Chanu lifted a total weight of 193 kg to win a gold medal at the Commonwealth Weightlifting Championships in Ahmedabad.… pic.twitter.com/cAHqsv60nP
— All India Radio News (@airnewsalerts) August 25, 2025
मीराबई चानूने 2020 च्या टोकिया ऑलिम्पिकमध्ये रोप्यपदक पटकावले होते. परंतु पॅरिस ऑलिम्पिकमपध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागल्यामुळे पदक पटकावण्यात अपयश आलं होतं. मात्र, तिने आपल्या मेहनतीत सातत्य ठेवलं आणि दुखापतीतून सावरत पुन्हा एकदा जबरदस्त पुनरागमन केलं असून साऱ्या हिंदुस्थानाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.