
एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्या आवडीचा खाद्यपदार्थ तोही गरमागरम मिळावा, अशी प्रत्येक ग्राहकाची इच्छा असते. ग्राहक त्यासाठी भरमसाट पैसे मोजतोय म्हटल्यावर त्याचा तो अधिकारदेखील आहे. आपण ऑर्डर केलेला खाद्यपदार्थ थंड मिळाला तर आपण फारफार तर हॉटेलचा वेटर किंवा मॅनेजरला सुनावतो. परंतु एका व्यक्तीने हॉटेलमध्ये थंड फ्राईज खायला दिल्या म्हणून थेट पोलिसांनाच फोन केला. न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली आहे.
धक्कादायक म्हणजे पोलिसांनी ग्राहकालाच तुरुंगात डांबले आहे. त्यामुळे नेमके तिथे काय घडले हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. ज्या व्यक्तीला अटक झाली त्याचे नाव अँटोनी सिम्स आहे. अँटोनी सर्राईत गुन्हेगार आहे. 2018 सालापासून पोलीस त्याच्या शोधात होते. थंड फ्रेंज फ्राईज पाहून त्याच्या रागाचा पारा चढला आणि आपण गुन्हेगार आहोत याचाच त्याला विसर पडला असावा आणि त्याने स्वतःच पोलिसांना पह्न करून तक्रार दिली. पण त्याआधी रेस्टॉरंटच्या मॅनेजरनेही पोलिसांना पह्न करून बोलावले आणि त्या व्यक्तीला बेडय़ा ठोकल्या.




























































