
सामना ऑनलाईन । मुंबई
सतत सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी पूर्व भागातील पेपर बॉक्स कंपनीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडली आहे्. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर खासगी गाडीचे यात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर मातीचा ढिगारा उचलण्याचे काम सुरू आहे.
अंधेरी येथील पेपरबॉक्स कंपनीच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, त्यावेळचे हे दृश्य. #rain #MumbaiRains pic.twitter.com/kcY9oumIqd
— Saamana (@Saamanaonline) July 8, 2019
पेपर बॉक्स कंपनी ओएनजीसी परिसराजवळ असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र ओएनजीसीला कोणताही धोका नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.





























































