
सामना प्रतिनिधी । भोपाळ
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि भोपाळ लोकसभा उमेदवार दिग्विजयसिंह यांच्या यशासाठी साधूंची फौज घेऊन जाहीर हटयोग आणि मंत्रतंत्र यांचे प्रदर्शन करणारे कॉम्प्युटरबाबा अचानक भोपाळमधून गायब झाले आहेत.भाजपने तक्रार केल्यानंतर भोपाळचे जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी बाबांच्या हटयोग व धुनी प्रकरणाची चौकशी सुरु केल्यावर कॉम्प्युटरबाबांनी साधू समागम स्थानावरून अज्ञात स्थळी प्रयाण केले आहे.
Madhya Pradesh: Election Commission has issued a notice to Computer Baba after a complaint by BJP alleging that he was campaigning for Congress Bhopal candidate Digvijaya Singh and fanning communal sentiments. He has to reply within 24 hours (file pic) pic.twitter.com/POX4PGAP4X
— ANI (@ANI) May 9, 2019
कॉम्प्युटरबाबांच्या समागम सोहळ्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. तर शुक्रवारी भोपाळ मतदार संघातील प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कॉम्प्युटरबाबा कमी सक्रिय दिसत आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशासंदर्भात बाबांना काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
कोण आहेत कॉम्प्युटरबाबा
दिग्गीराजांसाठी प्रचारात उतरलेले कॉम्प्युटरबाबा शिवराज सिंह चौहान यांच्या भाजपप्रणीत सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तत्कालीन मध्य प्रदेश सरकारने त्यांना मंत्रीपद बहाल केले होते. मात्र काही दिवसांनी बाबा शिवराज सरकारवर नाराज झाले होते. बाबांनी विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्याविरुद्ध भूमिका घेत काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला.

























































