सीबीएसईचा विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर कोडिंग, डेटा सायन्सचा अभ्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सीबीएसई बोर्डाने सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात डेटा सायन्स आणि कॉम्प्युटर कोडिंगचा समावेश केला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

नवीन शिक्षण धोरणांतर्गत केंद्राने डेटा सायन्स आणि कोडिंग हे विषय शालेय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने सीबीएसईने 2021 मध्ये हे उद्दिष्ट साध्य केले आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. नवीन पिढी नव्या युगाची कौशल्ये शिकून सक्षम होईल, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोडिंगमुळे मुलांची तर्कसुसंगत विचार करण्याची क्षमता वाढेल तसेच त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाबाबतही माहिती मिळेल, तर डेटा सायन्समुळे डेटा कसा एकत्रित केला जातो, त्याचे विश्लेषण कसे केले जाते याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे संगणकीय काwशल्य, सर्जनशीलता, प्रॉब्लेम सोडवण्याचे काwशल्य आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्यही यामुळे वाढणार आहे. सीबीएसईचे अध्यक्ष मनोज आहुजा यांच्या मते, विद्यार्थी भविष्यात सहजपणे तंत्रज्ञानासंदर्भातील कौशल्ये शिकू शकतील. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.

  • सीबीएसईने याबाबत आपल्या सर्व शाळांना सूचना दिल्या असून नव्या सत्रापासून या विषयांना सुरुवात होणार आहे.
  • सहावी ते आठवीच्या शालेय वेळापत्रकात कोडिंगसाठी 12 तास असतील, तर डेटा सायन्ससाठीही 8 ते 12 तास वेळ देण्यात येणार असून अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठीही डेटा सायन्सचा समावेश कौशल्य विकासाअंतर्गत करण्यात येणार आहे.