
आफ्रिकन देश काँगोच्या उत्तर-पश्चिम भागातील इक्वेटर प्रांतात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे बोट उलटून ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारी वृत्तसंस्थेनुसार, मोटार बोट उलटल्याने हा अपघात झाला. बोटीत आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवासी आणि सामान होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बोटीतून रात्रीच्या वेळी अनेक लोक प्रवास करत होते. यावेळी प्रवास अधिक असल्याने बोट नदीत उलटली, ज्यात ८६ लोकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी होते.
स्थानिक प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, बोटीत किती प्रवासी होते याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, परंतु बचावकार्यात अजूनही सुरू आहे. काँगोमध्ये नद्या आणि तलावांवर अवलंबून असलेल्या वाहतुकीमुळे अशा दुर्घटना वारंवार घडतात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.