
भाजपच्या सोशल मीडिया विभागाने लिहून दिलेली स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने आज खाली मान घालून वाचली. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळले. यावरच टीका करताना माध्यमांशी संवाद साधना हर्षवर्धन सपकाळ असे म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “कोणाच्या तरी इशाऱ्यावरून त्यांनी (निवडणूक आगोगाने) आजचा मुहूर्त काढला आहे. निवडणूक आयोगाने आज अत्यंत जबाबदारीने, वस्तुनिष्ठ स्वरूपात चौकशीच्या अनुषंगाने, जबाबदारीने तथ्य, सत्य समोर मांडत असताना उत्तर देणे आवश्यक होते.”
ते म्हणाले, “मतांची चोरी थांबवण्यासाठी ठोस कारवाई करण्याऐवजी आयोग फक्त भाषणबाजी करत आहे. निवडणूक आयोग सतत प्रश्नांची उत्तरे देण्यापासून टाळाटाळ करत आहे. सरकार फक्त दिखाऊ भूमिका करत आहे.”