
केंद्रसरकारच्या विरोधात शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने काँग्रेस भुवनच्या आवारात उपोषण केले. शेतकरी विरोधी काळा कायदा आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. कृषी कायदे आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी शहरातील काँग्रेस भुवन येथे सकाळी 11 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली़. जिल्हाध्यक्ष अॅड़.विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़. या आंदोलनात अशोक जाधव, युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबे, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, अश्विनी आगाशे, रुपाली सावंत आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



























































