गरज 126ची तर फक्त 36 राफेल खरेदीचा करार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rafel-deal

सामना ऑनलाईन ।नवी दिल्ली

देशाच्या लष्करासाठी 126 राफेल जेट विमानांची गरज असताना केवळ 36 राफेल जेट विमाने खरेदी करण्याचा करार कसा काय मोदी सरकारने फ्रान्सच्या डससॉल्ट अव्हिएशन कंपनीबरोबर केला, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियाका चतुर्वेदी म्हणाल्या, तातडीची गरज होती तर सर्व विमाने एकाच वेळी देण्यास फ्रेंच कंपनीस का सांगितले नाही. काही विमाने प्रथम 2019 मध्ये तर उर्वरित विमाने 2022 मध्ये फ्रेंच कंपनी देणार आहे. तातडीची गरज होतीच तर राफेलची सर्व जेट विमाने ही 2019 पर्यंत हिंदुस्थानकडे द्यायला हवी होती.

देशाला 126 राफेल जेट हवी असताना भाजप सरकारने फक्त 36 राफेल जेट विमानांचा करार केला हे चमत्कारिक आहे, असे स्पष्ट करून चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, अब्जोपती मित्रासाठी सरकारने देशाच्या हितसंबंधांचा बळी दिला आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच राफेल जेट विमानाची किंमत 560 कोटी रुपये असताना ती 1670 कोटी रुपयांवर कशी काय गेली, असा सवालही त्यांनी केला.