राज्यातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार कोण आहे माहित आहे का?

1267

#MahaElection 2019 शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि 11 वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले गणपतराव देशमुख यांनी यंदा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गणपतराव देशमुख हे आतापर्यंत सर्वात वयोवृद्ध आमदार होते. त्यांचे वय 92 आहे. आता राज्यातील सर्वात वयोवृद्ध उमेदवाराचा मान काँग्रेसच्या एका नेत्याला मिळाला आहे.

तुळजापूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आणि उमेदवार मधुकर चव्हाण हे राज्यातील सर्वा वयोवृद्ध उमेदवार आहेत. चव्हाण यांचे वय 82 असून त्यांनी तुळजापूर मतदारसंघाचे सहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. चव्हाण यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवाराचा 29 हजार 400 मतांनी पराभव केला होता.

मधुकर चव्हाण यांनी राज्याचे पशु व दुग्धव्यवसाय मंत्रिपद भूषवले आहे. तसेच विधानसभेच्या उपाध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती. वयाच्या 80 व्या वर्षीही ते फिट आहेत, कारण तारुण्यात ते पैलवान होते अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली. मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे म्हणून सलग सहा वेळा ते निवडून आले आहेत. म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

यंदा मधुकर चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे राणा जगजितसिंह पाटील उभे आहेत. राणा जगजितसिंह पाटील हे पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आहेत. निवडणुकीपूर्वीच पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या